१. ‘काॅकरोच जनता पार्टी’ ही गम्मत जम्मत आणि केवळ उपहासात्मक पोस्ट मधून जन्माला आली.
२. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तृणमूलच्या काही नेत्यांनी गम्मत म्हणूनच त्याला समर्थन केलं आणि ‘आम्हीही पार्टीत सामील होऊ’ असं गमतीतच म्हटलं. त्यामुळे ती पोस्ट जास्तच व्हायरल झाली.
३. पोस्ट करोडो लोकांनी लाईक/सब्स्क्राईब केल्यामुळे सारेच अवाक झाले. त्यानंतर ‘आप’ आणि भाजपाने याचा राजकीय लाभ घेण्याची रणनीती आखायला सुरूवात केली.
४. राहुल गांधी, एनएसयूआय, कांग्रेस यांच्या तर्फे याच विषयावर आधीपासून देशात सुरू असलेली निदर्शने, सभा, मोर्चे यांना देशभर प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे सरकार अस्वस्थ होतेच. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत होते. सभांना परवानगी नाकारत होते. ही दडपशाही बघून युवकांमध्ये असंतोष हळूहळू पण देशभर आतल्याआत वाढत होता.
५. बंगालमध्ये ज्या प्रकारे पार्टी तोडली गेली. त्यानंतर जे तमाशे झाले, ते अंधभक्त आणि पापाचे डायरेक्ट लाभार्थी वगळता कुणालाही आवडले नाही. त्यामुळेही असंतोष वाढत गेला.
६. त्यावर उतारा म्हणून भाजपा आणि केजरीवाल यांच्या डोक्यातून कुटील रणनीती जन्माला आली. दीपके यांना अचानक भारतात बोलावण्यात आले.
७. सोनम वांगचूक यांना अण्णा हजारेच्या भूमिकेसाठी ‘साईन’ करण्यात आले. (सोनम यांनी स्वतः ते अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे.)
८. कुठलाही अर्ज केलेला नसतांना एअरपोर्टवरच पोलीसांनी दीपके यांना जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी देऊन टाकली.
९. जंतर मंतरचं आंदोलन ठराविक वेळात गुंडाळून राहुल गांधी आणि एनएसयूआयचा इफेक्ट एका झटक्यात पंक्चर करता येईल, या भ्रमात ‘रंगा-बिल्ला’ होते.
१०. पहिल्या दिवशी ५ वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी दिली असताना दिपके आणि वांगचूक तिन साडेतीन वाजताच जंतर मंतर सोडून निघून गेले होते. ते कुठं गेले होते? कुणालाही माहीत नाही. नंतर ते परतही आले नाहीत. (असं सहसा आंदोलनात कधी होत नसते. नागपूरला शेतकरी आंदोलन जोरात सुरू असताना, हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले असतांना.. आंदोलनाचे तथाकथित नेते बच्चू कडू मंत्र्यांकडे मुंबईला अचानक निघून गेले.. आणि नंतर मुंबईतून आंदोलनस्थळी पुन्हा परतलेच नाहीत. तो प्रसंग आठवा. आता बच्चू कडू कुठं आहेत?)
११. जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतरही देहरादून येथे राहुल गांधी यांची प्रचंड मोठी सभा झाली. जंतर मंतरपेक्षा कितीतरी पटीने जास्त विद्यार्थी तिथं उपस्थित होते. असंतोष वाढतच होता.
१२. जंतर मंतरवर काही लोकांनी नकली राष्ट्रवाद, नकली धर्मवाद तर काहींनी आपल्या जातीयवादाच्या पिपाण्या वाजवून पाहील्या. आपापले झेंडे घुसवण्याचा आगाऊपणा करून पाहीला. पण तो फारसा चालू शकला नाही.
१३. जसा एकीकडे राहुल गांधी आणि एनएसयूआय यांना साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू होता.. तसाच त्याच जंतर मंतर वर आणि त्याच विषयावर नियमित आंदोलन करत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेहा बोरा (AISA) यांच्याकडे मात्र जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. नेहा बोरा आणि सहकाऱ्यांनी वांगचूक आणि दीपके यांच्यापेक्षा जास्त दिवस उपोषण केलं, हे वास्तव आहे! (..दिपके यांचे उपोषण मात्र दीड दिवसात संपलं!)
१४. दरम्यान राहुल गांधी आणि खरगे यांनी प्रधान मंत्री निवासासमोर धरणे देऊन थेट मोदी आणि शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली..आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाचं पाऊल आडमार्गावरून राजमार्गावर आलं! देशाच्या आणि ‘जेन झी’च्या मनात असलेली मागणी पहिल्यांदा देशासमोर.. जगासमोर आली आणि वांगचूकसह त्यांची बायको प्रचंड खवळली. केजरीवाल खवळले. संजय सिंग यांच्या मार्फत राहुल गांधी यांच्या विरोधात बिनडोक ट्वीट करवून घेतले. (केजरीवालची कंगणा झाली!)
१५. नेहा बोरा आणि सहकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. संयुक्त प्रेस घेतली. राहूल यांनी आंदोलनावर पक्षिय शिक्का मारण्याचा जराही प्रयत्न केल्याचे जाणवले नाही. ही त्यांच्यातील परिपक्वता आणि काही ‘आप’ वगैरे सारख्यांची केविलवाणी धडपड अधोरेखित करणारी गोष्ट आहे! मात्र.. या निमित्ताने प्रत्येकाचा आवाका बऱ्यापैकी देशासमोर आला.
१६. आता हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नाही. ते ‘जेन झी’चे आहे. मात्र.. काही प्रमाणात का होईना, पण.. कम्युनिस्ट आणि काँग्रेस या विचारधारेची सकारात्मक बैठक त्याला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. राजकीय धोरण निश्चित असल्याशिवाय फारसं काही हाती लागत नसते.
१७. ‘जंतर मंतर’ प्रकरणावरील माझं आजवरचं आकलन हे असं आहे! देश जागा होतो आहे, जनतेचा आत्मविश्वास परत आला आहे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे!
१८. मात्र लांडगे कधीही शाकाहारी होऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवणंही गरजेचं आहे! ही जेमतेम सुरूवात आहे! विचारपूर्वक निर्णय होईल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
१९. पण ‘रंगा-बिल्ला’ एकटे नाहीत.. हे वास्तव लक्षात घेऊनच पुढं जावं लागणार आहे. केजरीवाल, नितीश, चंदूबाबू, पासवान, मायावती हे लोकही कौरव सेनेचाच हिस्सा आहेत.. हे देखिल सत्य आहे! कारण.. यापैकी कुणालाही ‘गांधी’ परवडत नाही, झेपत नाही..!
तूर्तास एवढ..
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर
–
युवा भारत.. नवा भारत!









