
ठाण्यात ‘दिव्यांग कला केंद्र’ उभारणार; ३६ जिल्ह्यांतील दिव्यांग कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
ठाणे | दिव्यांग मुलांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना नवी ओळख आणि त्यांच्या कलेला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाणे शहरात लवकरच दिव्यांग कला केंद्र उभारण्यात येणार आहे.