द्वारकाधीश साखर कारखान्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण


नाशिक | १५ ऑगस्ट २०२६ – द्वारकाधीश साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील प्रांगणात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

कारखान्याचे चेअरमन मा. शंकरराव आनंदा सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्ष श्रीमती सावंत ताईसाहेब यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि कर्मचारी वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचा सन्मान केला. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि प्रगती यासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला.

या सोहळ्यास कार्यकारी अधिकारी भालेराव, प्रशासकीय अधिकारी वाघ, जनरल मॅनेजर करपे, डिस्टिलरी मॅनेजर सोनवणे, चीफ अकाउंट भूषण नांद्रे, शेतकी अधिकारी विजय पगार, कार्यालयीन अधीक्षक सतीश सोनवणे, चीफ इंजिनियर भवर, केमिस्ट वाघ, कामगार अधिकारी पठाण, शशिकांत निकम, राकेश निकम, हेमंत खैरनार, केनयार्ड प्रमुख नहीरे, गोडाऊन विभाग प्रमुख भंडारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच कारखान्यातील सुरक्षारक्षक, महिला भगिनी आणि कामगार बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढविला.

स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता देशभक्ती, एकता, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाला बळ देणारा प्रेरणादायी क्षण ठरला. कारखाना परिवाराने एकत्रितपणे स्वातंत्र्य दिन साजरा करत राष्ट्रध्वजाचा गौरव वाढविला.


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!