आश्वासन नको, आता ठोस कार्यवाही हवी; मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा


मुंबई : मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाच्या भूमिकेत असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारकडून यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांची प्रभावी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही अनेक आंदोलने आणि उपोषणे केली आहेत. मात्र वारंवारच्या आंदोलनांमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याने पुन्हा आमरण उपोषणाची वेळ येणे ही चिंतेची बाब असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.

सरकारने आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर कायदेशीर, ठोस आणि तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवून त्याबाबत स्पष्ट निर्णय आणि अंमलबजावणीचा मार्ग निश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“आश्वासनांपेक्षा कृती महत्त्वाची” असा स्पष्ट संदेश देत सरकारने आता पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीशी खेळ होऊ नये, आंदोलनाची वेळ वारंवार येऊ नये आणि मराठा समाजाच्या मनातील अस्वस्थता दूर व्हावी, यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सरकार जागे व्हा; मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा!


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!