कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलन मागे घेताना केंद्र सरकारने आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, तसेच कोणत्याही भाजपशासित राज्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होणार नाहीत, असे आश्वासन दिल्याचा दावा CJP ने केला आहे. मात्र हे आश्वासन पाळले जात नसल्याचाCJP चा सरकारवर गंभीर आरोप; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे गंभीर आरोप पक्षाने केला आहे.
‘आंदोलकांना लक्ष्य केले जात आहे’ – CJP
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारवर आश्वासनभंगाचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील विविध भागांत आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि अटक करण्याच्या घटना समोर येत आहेत.
या राज्यांबाबत व्यक्त केली चिंता
सौरव दास यांनी विशेषतः आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार येथील घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. या राज्यांत आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई होत असल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही
CJP ने केलेल्या आरोपांवर केंद्र सरकारकडून किंवा संबंधित राज्य सरकारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Views: 94








