मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : लोकशाहीतील निष्पक्षता, पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज मुंबईत जनआंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष मा. अशोक पांचाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांवर त्यांनी बुलंद आवाज उठवला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या व कर्जदार जामीनदार हक्क संरक्षण समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. यामिनी पांचाळ या देखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बोलताना मा. अशोक पांचाळ म्हणाले, निवडणूक ही लोकशाहीची आत्मा आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असलाच पाहिजे. मतदारांच्या प्रत्येक शंकेचे निरसन झाले पाहिजे.

पक्षाने या आंदोलनातून आपली ठाम भूमिका मांडली असून, निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही शंकास्पद बाबीची निष्पक्ष चौकशी व्हावी, यंत्रणेने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संविधानाचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
“सत्ता येते जाते, पण लोकशाही आणि संविधान कायम राहिले पाहिजे,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








