कडूबाई खरात यांनी केला आपल्या गाण्यातून बौद्ध समाजाचा अपमान; आंबेडकरी जनता संतप्त


मुंबई / छत्रपती संभाजीनगर – लोकगायिका कडूबाई खरात यांच्या नव्या गाण्यात बौद्ध समाजाचा अपमान केल्याचा आरोप होत असून, यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गाण्यातील “जागा दिसना हा जय भीम वाला, गल्लीत आणि दिल्लीत यांना कुणीच पुसना” या ओळींवर आक्षेप घेतला जात आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या शब्दांमधून जय भीम म्हणणाऱ्या समाजाला हिणवले गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर या गाण्याविरोधात निषेधाचे व्हिडिओ, पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक संघटनांनी कडूबाई खरात यांनी जाहीर माफी मागावी आणि हे गाणे तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजातील तरुणांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. “ज्या समाजाने आम्हाला डोक्यावर घेतले, त्याच समाजाबद्दल असे बोलणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

– रविंद्र राहुल रोकडे 


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!