चेंबूर, मुंबई | प्रतिनिधी
चेंबूर येथील माता रमाई आंबेडकर वस्तीगृहातील विद्यार्थिनींच्या विविध समस्या आणि मूलभूत सुविधांबाबत वंचित बहुजन आघाडीकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी वस्तीगृहाला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

यावेळी स्नेहल सोहनी यांनी वस्तीगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच वस्तीगृहातील स्वच्छता, सुरक्षितता, उपलब्ध सुविधा आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

विद्यार्थिनींनी मांडलेल्या विविध प्रश्नांची स्नेहल सोहनी यांनी गांभीर्याने दखल घेतली. संबंधित प्रशासनाकडे या समस्यांचा पाठपुरावा करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.









