‘Vile Parle’ची ‘VILLE PARLE’ अशी चुकीची स्पेलिंग; रेल्वे प्रशासन झोपेत?


मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील महत्त्वाच्या विले पार्ले रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या फलकावर ‘Vile Parle’ ऐवजी ‘VILLE PARLE’ अशी चुकीची इंग्रजी स्पेलिंग आढळून आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर आणि फलकांच्या तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विले पार्ले हे मुंबईतील महत्त्वाचे उपनगरीय रेल्वे स्थानक असून दररोज हजारो प्रवासी या परिसरातून प्रवास करतात. अशा ठिकाणी स्थानकाच्या नावाचीच चुकीची स्पेलिंग असलेला फलक दिसणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

फलकावर मराठीत ‘विले पार्ले’ असे नाव दिसत असले, तरी इंग्रजीमध्ये ‘VILLE PARLE’ असे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात प्रचलित आणि अधिकृत इंग्रजी लेखन ‘VILE PARLE’ असे आहे. एका अतिरिक्त ‘L’ मुळे स्थानकाच्या नावाचेच चुकीचे सादरीकरण होत आहे.

फलक लावण्यापूर्वी तपासणी झाली नाही का?

रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी दिशादर्शक आणि स्थानकांच्या नावाचे फलक लावण्यापूर्वी त्यांची भाषा, शब्दलेखन आणि अधिकृत नाव यांची पडताळणी होणे अपेक्षित असते. मात्र या फलकावरील चुकीच्या स्पेलिंगमुळे फलक तयार करणाऱ्या संबंधित यंत्रणेने आणि त्याला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी नेमकी कोणती तपासणी केली? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने या चुकीची तातडीने दखल घेऊन फलक दुरुस्त करावा, अशी मागणी केली आहे

रेल्वे प्रशासन अशा चुकांकडे कधी लक्ष देणार? की चुकीच्या स्पेलिंगचा फलक असाच प्रवाशांचे स्वागत करत राहणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
छायाचित्र : विले पार्ले परिसरातील चुकीचे स्पेलिंग असलेला फलक


63
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!