मुंबई, दि. ०७ सप्टेंबर २०२६
भारतीय चलनाच्या खऱ्या नोटा असल्याचे भासवून बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अशी उघड झाली टोळी
दिनांक ६ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा कक्ष-२ मुंबईला गुप्त माहिती मिळाली होती की, मेट्रो सिनेमाजवळील वासुदेव बळवंत फडके चौक परिसरात एक महिला व एक पुरुष खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा विकत असल्याचे समजले. एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले जात होते.
सापळा रचून अटक
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचला. संबंधित ठिकाणी एक महिला २७० बनावट नोटांसह पोलिसांच्या हाती लागली. तिने ५००/- रुपयांच्या बनावट नोटा एका इसमाकडून मिळवल्याची कबुली दिली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुर्ला स्टेशन परिसरातून त्या इसमालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५००/- रुपयांच्या तब्बल १,८५८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
एकूण जप्ती
दोघांकडून मिळून ५००/- रुपये दर्शनी किमतीच्या एकूण २,१२८ बनावट नोटा (एकूण किंमत रु. १०,६४,०००/-) जप्त करण्यात आल्या.
गुन्हा दाखल
आझाद मैदान पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १७८, १८०, ६७(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-२ मार्फत सुरू आहे.
यशस्वी कामगिरी
पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कांत उपाध्याय, पोलिस उपायुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, सहाय्यक पोलिस आयुक्त डी-दक्षिण श्री. दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-२ चे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. दिलीप तेजनकर, पोलिस उपनिरीक्षक श्री. संकल्प मोकल आणि पथकाने ही कामगिरी पार पाडली.
✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)









