घरफोडी करून मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार 5 तासात गजाआड! पार्कसाईट पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


विक्रोळी / पार्कसाईट: अभिलेखावरील सराईत आरोपीस अटक, मोबाईल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस

मुंबई: पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अवघ्या 5 तासात बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
दि. 08/09/2026 रोजी पार्कसाईट पोलीस ठाण्यात फिर्यादींनी तक्रार दिली होती की, उघड्या घरात प्रवेश करून त्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. याप्रकरणी गु.र.क्र. ८७३/२०२६ कलम ३०५ (अ) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी/नितीन झाडे व पथकाने घटनास्थळ व परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा काढला. अवघ्या 05 तासात पोलिसांनी अभिलेखावरील आरोपी फिरोज मो. शकील शेख उर्फ चुहा, वय 25 वर्षे, रा. टी. अंबिका नगर चाळ, अप्पर डेपो पाडा, पार्कसाईट, विक्रोळी (प) याला अटक केली.

चौकशीत मोठा खुलासा!

आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

1) गु.र.क्र. ८७३/२०२६

2) गु.र.क्र. ८७९/२०२६

3) गु.र.क्र. ८८०/२०२६

असे एकूण 03 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून एकूण 1,48,000/- रु किंमतीचे 09 महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

कोण आहे हा ‘चुहा’?

अटक आरोपी फिरोज उर्फ चुहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यात जबरचोरी, चोरी, घरफोडी, अवैध शस्त्र बाळगणे असे एकूण 20 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

वरिष्ठांची मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी

ही संपूर्ण कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवन भारती सो, सह पोलीस आयुक्त श्री. मनोज शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त श्री. अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्राची कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पार्कसाईट पोलीस ठाणे, श्री. अशोक लांडगे, सहा. पोलीस निरीक्षक नितीन झाडे, पो.उप.नि. अक्षय वाघ, पोह/विशाल गवारे, राहुल नवले, पोशि/मनोज सुरवाडे, रोहिदास भुसारी, दिपक तायडे यांनी पार पाडली.

पार्कसाईट पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!