पैसे नाही दिल्याने चाकूने वार; शिवाजी नगरमध्ये खुनाचा प्रयत्न, आरोपी अटकेत


२० रुपयासाठी जीव घ्यायला निघाला! गोवंडीत कामावरून घरी जाणाऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार

मुंबई: पैशांची मागणी नाकारल्याच्या रागातून एका २६ वर्षीय तरुणाने भररस्त्यात दुसऱ्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोवंडीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून शिवाजी नगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

दि. ०७/०९/२०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजताच्या सुमारास फिर्यादी अब्दुल्ला मो. अफजल मन्सुरी, वय २०, धंदा शिलाई, रा. शिवाजीनगर, गोवंडी हा कामावरून घरी जात होता. ९० फिट रोड, शांतीनगर रोड नं. ९, बैंगणवाडी, गोवंडी येथे आल्यावर अटक आरोपी (पुरुष, वय २६) याने त्याला अडवून पैशांची मागणी केली.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार देताच आरोपीने राग मनात धरून जवळील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने थेट हल्ला केला.

आरोपीने फिर्यादीच्या छातीवर, कपाळावरील उजव्या डोळ्याच्या वरील भुवईला, डाव्या हाताच्या कोपरावर आणि कमरेवर पाठीमागे वार करून गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेतच फिर्यादीने शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. ०८/०९/२०२६ रोजी गु.र.क्र. ५९३/२६, कलम १०९(१), ३९९, ३५१(२) बीएनएस २०२३ सह कलम ३७(१)(अ), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

✍️ रविंद्र राहुल रोकडे मुख्य संपादक (शिवार माझा)


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!