स्त्री जन्म तुझा अनोखा,
आयुष्य तुझे भन्नाट,
समाजाने लावली त्याची वाट!
जननी तू साऱ्या जगाची,
आयुष्य तू घडविलस,
गमावुनी अस्तित्व तू आम्हास रडविलस!
दुःखाचं ओझं तुझ्या पाठीशी,
कर अन्यायाचा प्रतिकार,
नी लढ स्त्री अस्तित्वासाठी!
कर प्रहार अन्यायावर,
कर प्रहार या वाढत्या लिंगभेदभावावर,
मग समाजात राहेल अभिमान तुझ्या स्त्री असण्यावर!
छेडछाडीचं सावट तुझ्या पदरी,
नको करू तू त्यास सहन,
हा सारा अत्याचार करायचा आहे तुला दहन!
प्रश्न आहे तुझ्या प्रतिष्ठेचा,
बलात्कार, अब्रूचे धिंडवडे हा सारा गैरप्रकार,
मोडुनी कर प्रगत भारताचं स्वप्न साकार !
– रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)
Views: 39









