भक्कम पुराव्याने मिळवून दिला न्याय; मानखुर्द पोलिसांच्या तपासामुळे 13 वर्ष जुन्या गुन्ह्यात आरोपीला 2 वर्षांची शिक्षा
मुंबई: तब्बल 13 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये मानखुर्द पोलिसांनी अखेर पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. कोर्टात भक्कम पुरावे आणि प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे कुर्ला येथील न्यायालयाने दोन्ही प्रकरणांतील आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
पोलीस उप आयुक्त, पूर्व परिमंडळ-1 यांच्या कार्यालयाकडून दि. 10/09/2026 रोजी ही माहिती देण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्र. 52, कुर्ला, मुंबई यांनी हा निकाल दिला आहे.
प्रकरण 1 : विनयभंग प्रकरण – 2013
दि. 01/06/2013 रोजी सायंकाळी 5.30 वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून विनयभंग केला होता. फिर्यादीच्या पतीस मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मानखुर्द पोलीस ठाणे गु.र.क्र. 163/2013 अन्वये दाखल होती.
या गुन्ह्यात आरोपी छोटेलाल कतवारू गुप्ता, वय 41, व्यवसाय चालक, रा. जयहिंदनगर, सोनापूर, मानखुर्द याला न्यायालयाने दोषी ठरवले.
शिक्षा:
• कलम 354 – 2 वर्षे सक्त कारावास व 10,000 रु. दंड • कलम 452 – 2 वर्षे सक्त कारावास व 10,000 रु. दंड • कलम 323 – 3 महिने कारावास व 1,000 रु. दंड
प्रकरण 2 : धारदार शस्त्राने हल्ला – 2017
दि. 01/10/2017 रोजी पहाटे 01.45 वा. मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून धारदार शस्त्राने पोटावर आणि कमरेवर वार करून जखमी केले होते. गु.र.क्र. 269/2017.
या प्रकरणात 1) शंकर मोतीराम सोनटक्के, वय 26 व 2) विशाल प्रभाकर दळवी, वय 26, दोघेही रा. मानखुर्द यांना शिक्षा झाली आहे.
शिक्षा:
• कलम 324 सह 34 – 6 महिने सक्त कारावास व 1,000 रु. दंड • कलम 323 – 1 महिना कारावास व 1,000 रु. दंड
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
या दोन्ही गुन्ह्यांच्या सुनावणीदरम्यान कोर्ट कारकून यांनी साक्षीदार आणि पंच यांचे योग्य प्रकारे ब्रीफिंग केले, मुद्देमाल वेळेत न्यायालयात सादर केला. तसेच समन्स व वॉरंट पथकाने वेळेत बजावणी करून साक्षीदार हजर ठेवले. तपासी अधिकारी, कोर्ट अंमलदार आणि सरकारी अभियोक्ता यांच्या समन्वयामुळेच ही दोषसिद्धी शक्य झाली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवन भारती, सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर आयुक्त धनंजय कुलकर्णी, उप आयुक्त समीर शेख, सहा. आयुक्त प्रमोद कोकाटे, वरिष्ठ निरीक्षक बिलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हणमंत ओऊळकर, सपोनि सुरेश वसेकर आणि पथकाने केली आहे.
✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)









