अंधेरीत MD विक्रीसाठी आलेल्या ड्रग पेडलरला अटक; 4.6 लाखांचा माल जप्त


अंधेरीत लहान मुलाला जवळ ठेऊन MD विक्री; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4.6 लाखांचा माल जप्त
मुंबई: बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबईने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 153.6 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई अशी:

दि. 07/09/2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रा युनिटच्या पोलीस पथकास मिळालेल्या खबरीनुसार सापळा रचण्यात आला. मानो बीना अपार्टमेंट बस स्टॉपच्या बाजूला, वेस्ट 90 कंस्ट्रक्शनच्या समोर, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई या सार्वजनिक ठिकाणी एमडी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या 01 इसमास ताब्यात घेतले.

अटक आरोपीचे नाव:

मोहम्मद जमीर अब्दुल अजीज खान, वय 36 वर्षे, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई.

तपासात त्याच्याकडून 153.6 ग्रॅम एमडी (अं. किं. 4,60,800/- रु.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

ही उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष श्रीमती पौर्णिमा चौगुले (श्रृंगी) व सहा. पोलीस आयुक्त श्री. सुधिर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रा युनिटचे प्रभारी पो. नि. विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वात वांद्रा युनिट पोलीस पथकाने केली आहे.

या प्रकरणी पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्ष करत आहे.

✍️ रविंद्र राहुल रोकडे, मुख्य संपादक (शिवार माझा)


83
कृपया वोट करा

शिवार माझाच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!