उल्हासनगर | उल्हासनगर महानगरपालिकेने ३१ घरे आणि एका मशिदीला कारवाईच्या नोटिसा दिल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान बोलताना सुजात आंबेडकर यांनी महानगरपालिकेने दिलेल्या नोटिसांवर तीव्र आक्षेप घेत, ३१ घरे आणि मशिदीवरील कारवाई तात्काळ थांबवून संबंधित नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी केली.

उल्हासनगरमधील जुनी घरे नियमित करून नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काशी संबंधित आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. घरपट्टी, पाणी बिल, वीज बिल यांसारख्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांच्या घरांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सरकारने तातडीने सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तसेच उल्हासनगरमध्ये असलेल्या जुन्या धार्मिक स्थळांबाबतही सरकारने विशेष धोरण लागू करावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली. हिंदू मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, पारशी समाजाचे फायर टेंपल किंवा बौद्धांचे बुद्ध विहार अशा कोणत्याही जुन्या धार्मिक स्थळाला हात न लावता ‘स्पेशल विंडो’ अंतर्गत त्यांचे नियमितीकरण करण्यात यावे, अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली.
महामोर्चानंतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. नोटिसा तात्काळ मागे घेऊन कारवाई थांबवावी आणि संबंधित घरांचे नियमितीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष मनोज पवार, जिल्हा प्रवक्ते सोनू पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
____________________________________________

चळवळीच्या माध्यमातून अधिकारी घडावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील पहिले अँप.
आंबेडकराईट लर्निग अँप.
फक्त 350 रु. मध्ये आताच स्कॅन करून संपूर्ण कोर्स आपल्या मोबाईल मध्ये घेऊन भविष्याची वाटचाल करूयात…!
सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करून आपले विद्यार्थी अधिकारी बनवूया.
Application Link :- : https://play.google.com/store/apps/details?id=com.ambedkaritelearning.app.pro
अधिक माहितीसाठी संपर्क:- 8788766631, 8180937230, 7020867605









